गोंदिया– डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनद्वारा महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघ व ऑल इंडिया चेस फंडरशन यांचे संयुक्त विधमाने १६ ते १९ जून २0२२ ला रमेश विनायकराव कोतवाल यांच्या स्मृतीत महाराष्ट्र जुनियर फिडे रेटिंग ओपन व गर्ल्स बुद्धिबळ चैम्पियनशिप स्पध्रेचे आयोजन भवभूती रग मंदिर पुनाटोली, गोदिंया येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेत विजेत्यांना ५0 हजार रुपयाचे बक्षिस वितरण होणार आहे. त्याचप्रमाणे क्रमश: प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाने विजयी होणार्या खेळाडुची निवड राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पधेकरीता करण्यात येणार आहे. या स्पर्धात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हातील खेळाडू भाग घेऊ शकणार असून, बाहेरगावातील खेळाडुंची निवास व्यवस्था बापट लॉन येथे करण्यात आलेली आहे. या स्पध्रेचे उद््घाटन १६ जूनला सकाळी ९.३0 वाजता होणार असून, आयोजन समितीचे प्रमुख संरक्षक तथा आमदार डॉ. परिणय फुके, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ असोसिएशन हे उपस्थित राहणार आहेत. तरी गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त बुद्धिबळ खेळाडुनी या स्पर्धात सहभाग नोदंविण्याचे आव्हान गडचिरोली डिस्ट्रिक्ट अँम्याचुअर चेस असोसिएशन अध्यक्ष सतिश त्रिनगरिवार व इतर सदस्यांनी केले आहे.
|