राष्ट्रीय युवा पुरस्कार करीता नामांकन प्रस्ताव आमंत्रित

0
9

गोंदिया दि. 01, भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2020-21 या वर्षाकरीता नामांकन अर्ज – प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.

 गोंदिया जिल्हयातील सदर पुरस्काराकरीता 15 ऑक्टोबर 2022 ते 06 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अर्हता धारण करण्याच्या युवक, युवती व संस्थांनी नामांकन अर्ज प्रस्ताव https://awards.gov.in या पोर्टलवर  06 नोव्हेंबर 2022 पुर्वी भरावयाचा आहे. व सदर प्रस्तावाच्या दोन सारख्या प्रती आपल्या शिफारशीसह तात्काळ खासदूतामार्फत संचालनालयास पुढील कार्यवाही करण्याकरीता पाठविण्यात याव्यात.  कालावधी अल्प असल्यामुळे अर्ज [email protected]  च्या ईमेलवर पाठविण्यात यावेत. अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय गोंदिया येथे संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी कळविले आहे.