पिपरटोला (निंबा) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

0
33

गोरेगाव :-तालुक्यातील ग्राम पिपरटोला (निंबा) येथे जय सुर्यादेव क्रिकेट क्लब च्या सौजन्याने चार दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि. 11 रोज शुक्रवारला पंचायत समिती सभापती मनोज बोपचे  यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पंधरे पं.स सदस्य गोरेगाव, पिच पूजक बुधराम बिजेवार प्रसिद्धी प्रमुख भा.ज.पा. गोरेगाव व प्रमुख उपस्थितीत म्हणून दिवाकर चौधरी, शोभाराम जगणित, बाळकृष्ण पटले, रतिराम कटरे, देवकरण कटरे, तुलाराम जगणित, योगराज टेकाम, कैलाश ईळपाते, यशवंत जगणित, लोंढू टेकाम, केशोराव शिवणकर, ताराचंद बोपचे, रतिराम टेकाम, भाऊलाल बागडे, रमेश टेकाम,  टिलकचंद मडावी, चंद्रशेखर ठाकरे, सूर्यभान साखरे, व गावकरी उपस्थित होते.
सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 11,12,13 व 14 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले असून दि. 14/11 रोज सोमवार ला बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात प्रथम पुरस्कार 9001 रु. द्वितीय पुरस्कार 7001 रु. व तृतीय पुरस्कार 5001 रु. आहे.या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजना करिता संदिप कटरे, खोमेश जगणित, सतिश कटरे,अजय बोपचे, स्वस्तिक पारधी, भावेश ठाकरे, सचिन टेकाम, प्रविण परतेती, आशिष सराटे, पृथ्वीराज चव्हाण, राजेंद्र कोडवते, राजकुमार ढोरे, महेंद्र पटले यांनी सहकार्य केले.