राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे वर्चस्व अव्वल ठरले

0
26

 गोंदिया, दि.6 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी (14 व 17 वर्ष मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे 1 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत 14 व 17 वर्ष मुला-मुलींमध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग अव्वल ठरला.

         सदर क्रीडा स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे. 14 वर्ष मुले- फाईल वैयक्तिक- अर्जुन सोनवणे संभाजीनगर, ईपी वैयक्तिक- प्रथमेश कस्तुरे, सेबर वैयक्तिक- वेदराज कुंकले. 14 वर्ष मुले- फाईल सांघिक प्रथम- छत्रपती संभाजीनगर विभाग, द्वितीय संघ- मुंबई विभाग, तृतीय संघ- पुणे विभाग तृतीय संघ- अमरावती विभाग. ईपी सांघिक प्रथम- पुणे विभाग, द्वितीय- छत्रपती संभाजीनगर विभाग, तृतीय- लातुर विभाग तृतीय- अमरावती. सेबर सांघिक प्रथम- पुणे विभाग, द्वितीय- छत्रपती संभाजीनगर विभाग, तृतीय संघ- मुंबई विभाग तृतीय संघ- नागपूर विभाग.

         14 वर्ष मुली- फाईल वैयक्तिक- जिजाऊ पाटील, ईपी वैयक्तिक- जानव्ही जाधव, सेबर वैयक्तिक- तनुजा लहाणे. 14 वर्ष मुली- फाईल सांघिक प्रथम- छत्रपती संभाजीनगर विभाग, द्वितीय संघ- पुणे विभाग, तृतीय संघ- नागपूर विभाग तृतीय संघ- नाशिक विभाग. ईपी सांघिक प्रथम- लातुर विभाग, द्वितीय- पुणे विभाग, तृतीय- छत्रपती संभाजीनगर विभाग तृतीय- अमरावती. सेबर सांघिक प्रथम- लातुर विभाग, द्वितीय- कोल्हापुर विभाग, तृतीय संघ- पुणे विभाग तृतीय संघ- नागपूर विभाग.

         17 वर्ष मुले- फाईल वैयक्तिक- वेदांत मुंडे, ईपी वैयक्तिक- अर्थव खोत, सेबर वैयक्तिक- शौर्य बांते. 17 वर्ष मुले- फाईल सांघिक प्रथम- छत्रपती संभाजीनगर विभाग, द्वितीय संघ- नागपूर विभाग, तृतीय संघ- लातुर विभाग तृतीय संघ- पुणे विभाग. ईपी सांघिक प्रथम- लातुर विभाग, द्वितीय- अमरावती, तृतीय- कोल्हापुर तृतीय- नागपूर विभाग. सेबर सांघिक प्रथम- नागपूर विभाग, द्वितीय- लातुर विभाग, तृतीय संघ- कोल्हापुर विभाग तृतीय संघ- छत्रपती संभाजीनगर विभाग. 17 वर्ष मुली- फाईल वैयक्तिक- आर्या पोळ, ईपी वैयक्तिक- प्राजक्ता पवार, सेबर वैयक्तिक- प्रेरणा जाधव. 17 वर्ष मुली- फाईल सांघिक प्रथम- कोल्हापुर विभाग, द्वितीय संघ- मुंबई विभाग, तृतीय संघ- नागपूर विभाग तृतीय संघ- लातुर विभाग. ईपी सांघिक प्रथम- लातुर विभाग, द्वितीय- कोल्हापुर विभाग, तृतीय अमरावती विभाग, तृतीय मुंबई विभाग. सेबर सांघिक प्रथम- छत्रपती संभाजीनगर विभाग, द्वितीय- नागपूर विभाग, तृतीय संघ- मुंबई विभाग तृतीय संघ- कोल्हापुर विभाग यांनी आपले नाव कोरले.

         या स्पर्धा चार दिवसापासून गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाल्या. सर्व विजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट व मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना ट्रॉफी वितरीत करण्यात आले व खेळाडूंचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

        बक्षिस वितरण सोहळ्या प्रसंगी छत्रपती अवार्डी बुलढाणा शेषनारायण लोढे, महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनिल कुरंजेकर, फेन्सींग असोसिएशन गोंदियाचे अध्यक्ष पुष्कर सावंत, फेन्सींग असोसिएशन गोंदियाचे उपाध्यक्ष शैलेंद्र फुंडे, छत्रपती अवार्डी लातुर दत्ता गलाले, छत्रपती अवार्डी नाशिक राजु शिंदे, छत्रपती अवार्डी संभाजीनगर दिनेश वजारे, छत्रपती अवार्डी संभाजीनगर सागर मगरे, छत्रपती अवार्डी संभाजीनगर तुषार आहेर, छत्रपती अवार्डी नागपूर नंदकुणाल धनविजय, संदेश भागवत, केदार ढवळे, अभिजित मोरे, विजय जाधव, दिपक क्षीरसागर, सोयल वकील, श्रीमती झोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके, क्रीडा अधिकारी ए.बी.मरस्कोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         तलवारबाजी स्पर्धेचे पंच म्हणून सौरभ तोमर, अंकीत गतभिये, दिपक क्षीरसागर, पवन भोसले, आनंद साळुंखे, अजय त्रिभुवन यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भारत स्काऊट-गाईच्या जिल्हा समन्वयक चेतना ब्राम्हणकर, रविंद्र वाळके, विकास कापसे, अंकुश गजभिये, अतुल बिसेन, विनेश फुंडे, शिवचरण चौधरी, किसन गावड, आकाश भगत, नरेंद्र कोचे, शेखर बिरणवार, जयश्री भांडारकर तसेच संबंधित खेळाचे क्रीडा शिक्षक व पंच यांनी परिश्रम घेतले.