
अर्जुनी मोर. (सुरेंद्रकुमार ठवरे )-अटल जिल्हा क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद गोंदिया च्या विद्यमाने अर्जुनी मोर. तालुकास्तरीय बालक्रिडा सम्मेलन ता.१८ ते २० डिसेंबर ला तालुक्यातील इंजोरी या लहानश्या गावात मोठ्या थाटात पार पडला.
इंजोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर आयोजित तालुका क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती इंजी. यशवंत गणवीर यांचे हस्ते, पंचायत समिती सभापती सविता कोडापे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले, ध्वजारोहण गोंदिया जिल्हा परिषद चे गट नेते व बोंडगाव देवी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांचे हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी वरणकुमार शहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे ,गटविकास अधिकारी विलास निमजे, गटशिक्षणाधिकारी मांढरे, उपसभापती होमराज पुस्तोळे, जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते ,जयश्री देशमुख ,पौर्णिमा ढेंगे, पंचायत समिती सदस्य नूतन सोनवाणे, संदीप कापगते, डॉ. नाजूक कुंभरे, घनश्याम धामट, भाग्यश्री सयाम, चंद्रकला ठवरे, कुंदाबाई लोगडे, तथा डॉक्टर कुंदन कुलसुंगे, प्राचार्य राजन बोरकर, रवींद्र खोटेले ,दीपंकर उके, कैलास हांडगे ,अरविंद नाकाडे,मुख्या. विठोबा रोकडे, लाकेश्वर लंजे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उदघाटनीय समारोहाचे प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश मांढरे ,संचालन नमिता लोथे (लंजे), रमेश संग्राम तर आभार मुख्याध्यापक विठोबा रोकडे यांनी केले. तीन दिवस विविध सांस्कृतिक व विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरी येथे वर्ग 1ते 4आहेत आणि विध्यार्थी संख्या फक्त 23 आहे. शाळेचे मुख्या. विठोबा रोकडे आणि सहायक शिक्षक लाखेश्वर लंजे हे दोन्ही शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे घडवत आहेत .संपूर्ण गावाच्या आणि शाळा व्यवस्थापन समितिच्या सहकार्याने, तालुका स्तरीय अटल क्रिडा महोत्सवाचे आयोजन 465 लोकसंख्या असलेल्या छोट्याश्या इंजोरी गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने पार पडले. गावकऱ्यांच्या वतीने सर्व शिक्षक आणि खेळाडू विद्यार्थ्यांना सहा जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
महोत्सवात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात जि. प. प्राथ. शाळा, इंजोरी च्या विद्यार्थ्यांनी नाटिका, समुहनृत्य, समुहगीत गायन, एकलगीत गायन अशा विविध स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना माजी मंत्री राजकुमारजी बडोले यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सभापती सविताताई कोडापे, गटनेते व जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे,उपसभापती होमराज पुस्तोडे, मांढरे साहेब, सरपंच कुरूंदाताई वैद्य, रविंद्रजी खोटेले,दिपंकर उके यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले. शाळेतील शिक्षक, गावकरी व परिसरातील लोकांकडून बालचिमुकल्यांचे खूप कौतुक होत आहे.