गोंदिया,दि.२१ः जिल्हा क्रिडा विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत स्थानिक लावण्या एज्युकेशन सोसाइटी द्वारा संचालित चंचलबेन मणीभाई पटेल हायस्कूल गोंदियाच्या विद्यार्थ्याने उत्कृष्ठ कामगिरी बजावत सुवर्ण पदक १७ वर्षीय प्रद्युम्न लीनाताई प्रमोद फुंडे यांनी पटकावले.विभागीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संंधी प्रद्युम्न फुंडे यांना मिळाली आहे.विभागीय स्पर्धेकरीता निवड झाल्याबद्दल शिक्षण संस्थेचे संचालक गजेंद्र फुंडे व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.