नितिन जिंदलने राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत मारली बाजी

0
44
 *-एक सुवर्ण, दोन रजत व एक कांस्य पदक प्राप्त करून जिल्ह्याचा गौरव वाढविला
गोंदिया: महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वाटिक असोसिएशन आणि नागपूर जिल्हा जलतरण संघटनेच्या  संयुक्तपणे २१ आणि २२ सप्टेंबर रोजी जलतरण तलाव, नागपूर येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदियासह राज्यातील ३६ जिल्ह्यातील जलतरणपटुंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा २५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुष आणि महिलांसाठी खुली होती. यात गोंदिया जिल्ह्याच्या वतीने नितिन जिंदल अग्रवाल यांनी २०० मिटरमध्ये सुवर्ण पदक, ४०० मिटरमध्ये रौप्य पदक, १०० मिटरमध्ये रौप्य पदक व ५० मिटरच्या स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
ही २५ वी रौप्य महोत्सवी चॅम्पियनशिप होती. यात फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय आणि डायव्हिंग इव्हेंट्स यासारख्या जवळ-जवळ सर्व जलतरण शैलींमध्ये आणि मास्टर्स जलतरणपटूंच्या विविध वयोगटांमध्ये फ्रीस्टाइल रिले आणि पदक रिले आयोजित होती.त्यांच्या यशस्वितेवर गोंदियाकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यापुर्वीही नितिन जिंदल यांनी जलतरण स्पर्धेत ४ सुवर्ण पदक प्राप्त केले होते. विशेष म्हणजे गोंदिया येथील क्रिडा संकुलात ते जलतरणासाठी खेळाडूंना नियमित प्रोत्साहन देत असतात.