चिरचाळबांध हरिहरभाई पटेल विद्यालयाचा खो-खो संंघ विभागस्तरावर

0
193

आमगाव,दि.०३ -आमगाव येथील भवभूती काॅलेजच्या मैदानावर क्रीडा व युवा सेवा संचनालय द्वारा आयोजित गोंदिया जिल्हा खो-खो स्पर्धा नुकतीच पार पडली.यात हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांधचा 19 वर्षाखालील मुलांचा संघ अजिंक्य ठरला.या संघात रूपेश बोपचे कर्णधार, आर्यन चोरवाडे, डेव्हिड चोरवाडे,राजु मारबदे,राज चामलाटे,आदी शेंडे क्रिष्णा दुर्वे, समीर भांडारकर, विशाल शिवणकर,सुमीत मेश्राम, गोपाल चोरवाडे यांचा समावेश असून हे खेळाडू विभागीय स्पर्धांसाठी गडचिरोलीला जाणार आहेत.तर 17वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला. या दोन्ही संघांचे तसेच क्रिडा शिक्षक प्रा.धर्मेंद्र मेहर प्रशिक्षक कार्तिक बिसेन,दुर्गेश वंजारी यांचे बहुजन हिताय जगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जे.एस.राहांगडाले,सचिव एन.एन.येळे,प्राचार्य बन्सीधर शहारे ,प्रा.आर.एच.बांदरे, प्रा. जे.एन. तितीरमारे प्रा पी. एम.चुटे,आर.एस.कामथे,एल.एफ.लांडगे,पी. एच कामठे आर.यु.बागळकर, आणि इतर सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.