मिरज,दि.१७ः महाराष्ट्र शासना कडून घेणेत येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा सन २०२४ – २५ क्रिडा प्रकार खो खो स्पर्धा नुकतेच कवठेपिरान ता. मिरज येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत १४ वर्षे खालील वयोगट मुले यागटामध्ये जिल्हा परिषद शाळा विसापूर नं १ ने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत पहिल्या च प्रयत्नात जिल्ह्याच्या पटलावर जिल्हा परिषदेच्या शाळेने आपला ठसा उमटवला.
या विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन पं स तासगाव चे आदरणीय गटशिक्षणाधिकारीआबासो लावंड,विस्तार अधिकारी प्रदीप कुमार चव्हाण , मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रमेश राऊत यांचे व मार्गदर्शन शाळेतील शिक्षक दीपक काळे, मुनाफ नदाफ व विसापूर मधील युवा खेळाडू अभिजित पाटील , धीरज गायकवाड , ऋषिकेश , मयूर , विनय , रोहित व सर्व युवा सहकारी तसेच शाळा नं १ व २ चे सर्व शिक्षक यांचे लाभले.