तिरोडा,दि.०७ः तालुक्यातील खडकी/डोंगरगांव येथे रायजिंग स्टार क्रिकेट क्लब च्या सौजन्याने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य जगदिशभाऊ बावनथडे यांनी खेळपट्टीचे पुजन व फित कापुन केले.क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू व प्रेक्षकांना श्री.बावनथडे यांनी खेळात कुठलाही वाद-विवाद न करता स्पर्धा सुरळीत पार पाडण्याच्या सुचना केल्या.यावेळी ललित कटरे,कविता राज सोनेवाने,शिवप्रसाद पांडे,रोहित पटलेसह इतर उपस्थित होते.