अर्जुनी /मोर.: अर्जुनी मोरगाव येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राच्या टी 20 क्रिकेट संघात स्थान मिळवले होते.
टी 20 क्रिकेट असोशियन ऑफ इंडिया यांच्यातर्फे 16 वर्षीय वयोगटांमध्ये सामने खेळले जातात. यावर्षी ऑल इंडिया गोवा टी 20 नॅशनल चॅम्पियनशिप मडगाव येथे 15 एप्रिल ते 18 एप्रिल या दरम्यान पार पडली. महाराष्ट्राच्या बी संघामध्ये जी. एम. बी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल अर्जुनी/मोर. येथील निकुंज मनोहर शेडमाके याची निवड झाली होती. या चॅम्पियनशिप मध्ये त्याने उत्तम प्रदर्शन करून परीक्षकांचे मन वेधून घेतले. परीक्षकांनी त्याची निवड जूनमध्ये होणाऱ्या इंडो नेपाल आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट संघकरिता केली. त्याच्या या निवडीमुळे गावातून शाळेतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्याच्या या यशाचे संस्थाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, सचिव सर्वेश भुतडा, प्राचार्य जे. डी. पठाण, प्राचार्या शैव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी उप प्राचार्य महेश पालीवाल , पर्यवेक्षक एल. खोब्रागडे, मुख्याध्यापक कल्पना भुते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.