
गोरेगाव,दि.०८ः येथील मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव शाळेतील विद्यार्थ्यांनी दि. 06.08.2025 ला झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयाची परंपरा निरंतर राखत अंडर 15 या गटात बॅडमिंटन मध्ये प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विजयी झालेल्या चमूत दिशा भूमेश्वर येरणे, आयुषी राजेश शेळके, वैष्णवी विनोद मडावी, दिशा ढालेश्वर चौधरी यांचा सहभाग होता.
विजयी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था सचिव आर .डी.कटरे, मुख्याध्यापक सौ.सी.पी.मेश्राम, पर्यवेक्षक आर.बी. कोल्हे, क्रीडा शिक्षक ए.आर.रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक ए.आर.रामटेके व सर्व शिक्षकांना दिले.





