34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home यशोगाथा अगरबत्ती व्यवसायातून महिला सांभाळतात कुटुंबाची धूरा

अगरबत्ती व्यवसायातून महिला सांभाळतात कुटुंबाची धूरा

0
124

blank

तिरोडा,दि.29 : अदानी फाउंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून तसेच महिला आर्थिक विकास मंडळाच्या सहकार्याने तालुक्यातील ग्राम रामाटोला टिकारामटोला, मेंदीपूर, गुमाधावडा, गराडा व तिरोडा या गावातील प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनी तिरोडाच्या सभासद असलेल्या एकूण ६० महिलांनी गेल्या तीन वर्षापासून अगरबत्ती बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे.

व्यवसाय सुरू करतांना अदानी फाउंडेशन व मानव विकास मिशन यांच्या माध्यमातून ३ महिलीचा एक गट करून त्यांना एक अगरबत्ती बनविण्याची मशीन तसेच ३०० किलो अगरबत्ती मसाला व १०० किलो अगरबत्ती काड्या पुरविण्यात आल्या तसेच तयार केलेल्या अगरबत्तीची विक्री व्यवस्था सुद्धा करून देण्यात आली.
एका मशिनद्वारे एका दिवशी ५० ते ६० किलो अगरबत्ती बनविल्या जात असून एक किलो मागे १० हजार रुपये या प्रमाणे त्यांना मोबदला मिळतो. सरासरी एक महिला दिवसाला १५० ते २०० रुपये कमवित आहेत. सदर व्यवसायाच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्टीने सक्षम झाल्या असल्याने त्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह तसेच मुला-मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा योगदान देत आहेत. पर्यायाने कुटुंबाची धुरा सांभाळत आहेत.
महिलांना सदर व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल या दृष्टीने अदानी फाउंडेशन प्रयत्नरत असून येत्या महिन्यात सुंगधीत अगरबत्ती अमेझान व क्लीप कार्ट द्वारे ऑनलाईन विक्री प्रगतीशील शेतकरी महिला कंपनी द्वारा ‘आधिराक्षी’ या नावाने विकल्या जाईल असे अदानी फाउंडेशनचे हेड नितीन शिराळकर यांनी सांगितले.