37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामींना अटक

रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामींना अटक

0
338

blank

मुंबई”,: “आर्थिक गैरव्यवहार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आणि त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांच्यावर आहे.

“रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलीय. अन्वय नाईक आत्महत्या प्रकऱणी ही अटक असल्याची माहिती कळतेय. सध्या अर्णब गोस्वामी यांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेलं जाणार असल्याची माहिती आहे. अर्णब यांना अटक करण्यासाठी आज (बुधवारी) सकाळीच पोलिसांची टीम त्यांच्या घरी पोहोचली होती.२०१८ साली अन्वय नाईक (५३) आणि त्याच्या आईनं आत्महत्या केली होती. सीआयडी टीम याचा तपास करत आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ कोटी ४० लाख रुपयांचं बिल अदा न केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप अन्वय यांनी सुसाईट नोटमध्ये केला होता. अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीच्या स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनचं काम केलं होतं. यासाठी ५ कोटी ४० लाख रुपये एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून यायचं होतं. परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिलं जात नव्हत. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती.  तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली होती. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम ३०६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

blank