घुग्गुस येथील चिंचोली घाटावर 3 मुलं वर्धा नदीत बुडाले

0
152

चंद्रपूर,दि.21ः- पोहायला गेलेले 3 मुलं घुग्गुस येथील चिंचोली घाटावर वर्धा नदीत बुडाल्याची घटना आज घडली.या घाटावर 5 मुलं फिरायला गेले होते.ते आंगोळीकरीता उतरले असता  खोल पाण्यात गेल्याने वाहुन गेले.यामध्ये पृथ्वीराज आसुटकर,प्रेम गेडाम व प्रचन वानखेडे यांचा समावेश आहे.तर बचावलेल्या मध्ये अनिल गोगला व सुजल वनकर यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.