हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन

0
129

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते.काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ही देण्यात आला होता. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे.