सर्वात तरुण कॅबिनेट डॉक्टर, इंजीनियर आणि रिटायर्ड IAS अधिकाऱ्यांसह 4 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश

0
51

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह 11 मंत्र्यांचा राजीनामा

नवी दिल्ली--पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी 7 वर्षांच्या मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा विस्तार करणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता 43 मंत्र्यांचा शपथविधी होईल, त्यापैकी 24 नवीन चेहरे निश्चित झाले आहेत. विस्तारापूर्वी 11 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला असून प्रमोट होणार्‍या 7 मंत्र्यांची नावेही ठरण्यात आली आहेत.या नवीन कॅबिनेटला आतापर्यंत सर्वात युवा टीम मोदी असे म्हटले जात आहे, ज्यांचे एव्हरेज वय 58 वर्षे आहे. जाणून घ्या मोदींच्या नवीन टीमध्ये अजून काय खास आहे…

1. अनुभव

  • 4 माजी मुख्यमंत्री आहेत. 18 माजी राज्य मंत्री आहेत.
  • 39 माजी आमदार आहेत. यामध्ये 23 असे खासदार आहेत, ज्यांनी 3 पेक्षा जास्त वेळी लोकसभा क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व केले आहेत.
  • 46 मंत्र्यांना केंद्र सरकारसह काम करण्याचा अनुभव आहे.

2. शिक्षण आणि वय

  • 13 वकील, 6 डॉक्टर आणि 5 इंजीनियर आहेत. या व्यतिरिक्त 7 माजी सिव्हिल सर्वंट आहेत. म्हणजेच 43 शपथ घेणाऱ्यांमध्ये 31 उच्चशिक्षीत आहेत.
  • या नवीन टीमचे सरासरी वय 58 वर्षे आहे. यामध्येही 14 मंत्री असे असतील, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षाही कमी आहे.
  • नवीन टीममध्ये 11 महिला असतील आणि यामधून दोघींना कॅबिनेट मंत्रीचा दर्जा दिला जाईल.

3. जातीय समीकरण

  • 5 मंत्री अल्पसंख्यक समुदायातून असतील, यामध्ये एक मुस्लिम, 1 शिख, 1 ख्रश्चिन आणि 2 बौद्ध असतील.
  • 27 मंत्री ओबीसी समुदायातील असतील. यामधून 5 जणांना कॅबिनेट मंत्रीचा दर्जा दिला जाईल.
  • 8 ST शपथ घेतली, यामध्ये तिघांना 3 कॅबिनेटचा दर्जा मिळेल. हे अरुणाचल, झारखंड, छत्तीसगढ, प. बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा आणि आसामधून असतील. हे गोंड, संथाल, मिजी, मुंडा, टी ट्राइब, कोकाना, सोनोवाल जातींचे आहेत.
  • 12 SC शपथ घेतली. यामध्ये 2 जणांना कॅबिनेट मंत्रीचा दर्जा दिला जाईल. हे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, प. बंगाल, कर्नाटक, राजस्थान आणि तामीळनाडूतील असतील. यामध्ये रामदासिया, खटीक, पासी, कोरी, मादिगा, महार. अरुनदथियार, मेघवाल, धंगार जातींचे असतील.
  •  पुढच्या वर्षी 5 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय समीकरणांची दखल घेतली गेली आहे. तरी टॅलेंटचे बॅलेंसही यात ठेवले गेले आहे.

    1. ज्योतिरादित्य सिंधिया,2. सर्बानंद सोनोवाल,3. पशुपति नाथ पारस,4. नारायण राणे,5. भूपेंद्र यादव
    6. अनुप्रिया पटेल,7. कपिल पाटिल,8. मीनाक्षी लेखी,9. राहुल कसावा,10. अश्विनी वैष्णव,11. शांतनु ठाकुर
    12. विनोद सोनकर,13. पंकज चौधरी,14. आरसीपी सिंह (JDU),15. दिलेश्वर कामत (JDU),16. चंद्रेश्वर प्रसाद चंद्रवंशी (JDU),17. रामनाथ ठाकुर (JDU),18. राजकुमार रंजन,19. बी एल वर्मा,20. अजय मिश्रा
    21. अजय भट्ट,22. शोभा करंदलाजे

11 मंत्र्यांनी दिले राजीनामे

जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला आहे. असे मानले जाते की देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी विस्कळीत झालेली आरोग्य सेवा त्यांच्या राजीनाम्याचे कारण बनले. शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौधरी, महिला व बालविकास मंत्री देवोश्री चौधरी, खते व रसायनमंत्री सदानंद गौडा, कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, डॉ. बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी आणि रतनलाल कटारिया यांचा राजीनामा देखील घेण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला. त्यांना कर्नाटकचे राज्यपाल केले गेले आहे. एकूण 11 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.