
नवी दिल्ली-–मोदी मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा विस्तार सुरू झाला आहे. संध्याकाळी 6 वाजता 43 मंत्र्यांनी मोदी मंत्रिमंडळात शपथ घेण्यास सुरुवात केली.राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. शपथ ग्रहण करणारे सर्व 43 खासदार हॉलमध्ये उपस्थित आहेत. 15 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. 28 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जात आहे.रम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी पूर्वी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ.हर्षवर्धन यांच्यासह 12 मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 मंत्र्यांचा राजीनाम्याचा स्वीकार केला आहे.
शपथ घेणाऱ्या 28 राज्य मंत्र्यांमध्ये सात महिला आहेत. मोदींच्या 8 वर्षांच्या कार्यकाळात यावेळी सर्वात जास्त मंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळात 7 आणि 2019 मध्ये 6 महिला मंत्री होत्या. यानंतर हरसिमरत सिंह कौर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
सर्वप्रथम राणेंनी घेतली शपथ
सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदार नारायण राणे यांना शपथ दिली. यानंतर आसामच्या सरबानंद सोनोवाल यांनी शपथ घेतली. त्यानंतर मध्य प्रदेशच्या वीरेंद्र कुमार खटीक यांनी शपथ घेतली. त्यांना मध्य भारताचा दलित चेहरा असलेले ठावरचंद गहलोत यांच्या जागी मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले.

मध्य प्रदेशातूनच ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्र्यांची शपथ दिली गेली. त्यांच्या आधी शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रपतींना नमस्कार केला, पण सिंधिया तसे करण्यास विसरले आणि थेट त्यांच्या खुर्चीवर बसले. जेव्हा कुणीतरी आठवण करुन दिली, तेव्हा ते परत आले आणि त्यांनी राष्ट्रपतींना अभिवादन केले.https://youtu.be/I0bApIIlwj0
हे बनले कॅबिनेट मंत्री
1. नारायण राणे,2. सर्बानंद सोनोवाल,3. वीरेंद्र कुमार,4. ज्योतिरादित्य सिंधिया,5. आरसीपी सिंह,6. अश्विनी वैष्णव
7. पशुपति कुमार पारस,8. किरण रिजिजू,9. राजकुमार सिंह,10. हरदीप सिंह पुरी,11. मनसुख मंडाविया
12. भूपेंद्र यादव 13. पुरुषोत्तम रूपाला 14. जी किशन रेड्डी 15. अनुराग ठाकुर 16. पंकज चौधरी 17. अनुप्रिया पटेल 18. सत्यपाल सिंह बघेल 19. राजीव चंद्रशेखर 20. शोभा करंदलाजे 21. भानुप्रताप सिंह वर्मा 22. दर्शना विक्रम जरदोश 23. मीनाक्षी लेखी 24. अन्नपूर्णा लेखी 25. ए नारायण स्वामी 26. कौशल किशोर 27. अजय भट्ट 28. बीएल वर्मा 29. अजय कुमार 30. देवसिंह चौहान 31. भगवंत खूबा 32. कपिल पाटिल 33. प्रतिमा भौमिक 34. सुभाष सरकार 35. भागवत कृष्ण राव कराड़ 36. राजकुमार रंजन सिंह 37. भारती प्रवीण पवार 38. विश्वेश्वर टुडू 39. शांतनु ठाकुर 40. महेंद्र भाई मुंजापारा 41. जॉन बारला 42. एल मुरुगन 43. नीतीश प्रामाणिक