उद्यापासून 4 दिवस बँका बंद; जाणून घ्या कारण!

0
211

नवी दिल्ली| जर तुम्हाला काही बँकेची कामं करायची असतील आजच पुर्ण करणं गरजेचं होतं. कारण उद्यापासून 4 दिवस बँक बंद असणार आहे. भारतीय रिसर्व बँकने या आठवड्यात बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सलग 4 दिवसांची सुट्टी निश्चित केल्यानं बँका बंद असणार आहेत. पुढील 4 दिवस बँका जरी बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत.

बँकेला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. 28 ऑगस्टला महिन्यातील चौथा शनिवार असल्यानं बँक बंद असणार आहे. तर त्यानंतर 29 तारखेला रविवारी असल्यानं सर्वत्र बँका बंद असतील, या दिवशी साप्ताहिक सुट्टी असेल. 30 ऑगस्टला कृष्ण जयंती आहे. त्यामुळे 30 तारखेला देखील बँका बंद असतील.

कृष्ण जयंती असल्यानं अहमदाबाद, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू , कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर, गंगटोक आणि चंदीगड याठिकाणच्या बँका 30 तारखेला बंद असतील तर, काही ठिकाणी 31 तारखेला कृष्ण जयंती साजरी केली जाते. त्यामुळे काही ठिकाणी 31 तारखेला सुट्टी असणार आहे.

दरम्यान, 4 दिवस बँका जरी बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर एटीएम सेवा देखील सुरू करणार असणार आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक व्यवहार करण्यास लोकांना अडचणी नाहीत.