Home Top News सांड्रा जंगलातील चकमकीत जहाल दोन नक्षलवादी ठार

सांड्रा जंगलातील चकमकीत जहाल दोन नक्षलवादी ठार

0

गडचिरोली,दि. ११: महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील सांड्रा जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या दोन वेगवेगळया चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार झाले. त्यात एक महिला व एका पुरुष नक्षल्याचा समावेश आहे. “मंगी” असे मृत महिला नक्षलीचे नाव असून, ती छत्तीगडमधील पश्चिम बस्तर भागातील सांड्रा दलमची कमांडर होती. मृत पुरुष नक्षल्याचे नाव कळू शकले नाही.सी 60 पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हयातील फारसेगड हद्दीतील सांड्रा जंगलात बिजापूर व गडचिरोली जिल्हा पोलिस संयुक्तपणे नक्षलविरोधी मोहीम राबवीत होते. दरम्यान आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. ठार झालेल्या मंगी नामक महिला नक्षलीवर १२ लाखांचे बक्षिस होते. या घटनेनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. मात्र काही क्षणातच पुन्हा घटनास्थळाच्या दक्षिणेला चकमक उडाली. यात एक पुरुष नक्षली ठार झाला. त्याच्यावर २ लाखांचे बक्षिस होते. या घटनास्थळावरुन पोलिसांना एक रायफल, एक भरमार, ५ मॅगझिन्स व नक्षल्यांचे लिखित साहित्य मिळाले. त्यानंतर पोलिस नक्षल्यांचे मृतदेह घेऊन परत जात असताना पुन्हा चकमक उडाली. परंतु काहीही नुकसान झाले नाही. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version