Home Top News भोंग्याच्या निर्णयाचा “भंडारा” जिल्ह्यातील मंदिरांना बसणार सर्वाधिक फटका

भोंग्याच्या निर्णयाचा “भंडारा” जिल्ह्यातील मंदिरांना बसणार सर्वाधिक फटका

0

भंडारा-राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावर बंदीची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकर आहेत त्यांनी कायद्याचे पालन करून त्याची परवानगी घ्यावी असे आवाहन केले आहे.मात्र, महाराष्ट्रातील “भंडारा” जिल्ह्यात या निर्णयाचा सर्वाधिक फटका मंदिरांना बसणार आहे.

“भंडारा” जिल्ह्यात 1 हजार 525 मंदिर आणि 50 मस्जिद आहेत. मुस्लिम बांधवांच्या 50 मशीदींपैकी 43 मशिदींनी भोंग्यांची परवानगी काढलेली आहे. तर, अवघ्या 7 मस्जिदीवरील भोंगे बेकायदेशीर आहेत.

*हिंदूंच्या 1 हजार 525 मंदिरांपैकी केवळ 11 मंदिरावरील भोंग्यानी परवानगी घेतलीय आहे. तर तब्बल 1 हजार 514 भोंगे अनधिकृत आहेत. हिंदू मंदिरावरील अनधिकृत भोंगे जास्त संख्या असणाऱ्यांचा “भंडारा” जिल्हा आहे.या जिल्ह्यातील 202 लोकांना कलम 149 अन्वये नोटीस देण्यात आली आहे. यामुळे या भोंग्याच्या राजकारणात सर्वात जास्त फटका हिंदू मंदिरांना बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version