
मुंबई,दि.24ः- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांचा मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच विविध विषयांवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच मुंबई 26/11 हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे.
यशवंत जाधव आणि ठाकरे परिवारांचे कोणते आर्थिक संबंध?
मुख्यमंत्री ठाकरे हे कुणाकुणाचे पार्टनर आहेत? तसेच यशवंत जाधव आणि ठाकरे परिवारांचे कोणते आर्थिक संबंध आहेत? यशवंत जाधवांनी 1 हजार रुपयांची काळी माया जमवली असल्याचा आरोप तसेच विविध प्रश्न सोमय्यांनी या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्र्यांना केले आहेत.“बिमलकुमार रामगोपाल अग्रवाल यांची तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक होऊन ते सध्या जामिनावर आहेत. समर्थ इरेक्टर डेव्हलेपर्स ही बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधव यांची भागीदारीमधील कंपनी आहे. या कंपनीने बद्री प्राईव्हेट लिमिटेड कंपनीकडून काही महिन्यांपूर्वी मलबार हिल येथे रि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट 80 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सोमय्यांच्या आरोपानंतर आता शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे.
हेमंत करकरेंचं बुलेटप्रूफ जॅकेट बोगस होतं – सोमय्या
उद्धव ठाकरे यांचा कसाबशी व्यावासायिक संबंध
नवाब मलिक हे दाऊदचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे यांचा कसाबशी व्यावासायिक संबंध आहेत असा आरोप सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. तर नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत. हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप सोमय्यांनी केला आहे.