“आधी संघाच्या कार्यकारिणीमध्ये सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा, मग आमच्यावर बोला”

0
29

मुंबई |  रेशीमबागेतील संघाच्या कार्यकारिणीमध्ये या देशातील सर्व जातींना आरक्षण दिलं पाहिजे, असा ठराव आधी करा आणि मग आमच्यावर बोला, असं आव्हान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलंय.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन मुंबईत पार पडले.त्यावेळी ते बोलत होते.

विरोधक आज उठतात आणि आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतात. मध्यप्रदेशच्या निकालाचे दाखले विरोधक देतात. मग सत्ता असताना भाजपने मागच्या पाच वर्षात मध्यप्रदेशसारखा निर्णय का घेतला नाही? असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच सुप्रीम कोर्टात साक्षीपुरावे सादर झाले आणि फक्त निकाल आमच्या काळात लागला. मग आमच्यावर कसे काय आरोप करतात? भाजपने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, अशी खरमरीत टीकाही धनंजय मुंडे यांनी केली.