देहूनगरीत पंतप्रधान मोदींची घोषणा:पालखी मार्गांच्या विकासासाठी 1100 कोटी खर्च करणार

0
20

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर सभेला संबोधित करताना पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी सरकार 1100 कोटींचा खर्च करेल. या माध्यमातून 350 किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली.

पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम 3 टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम 2 टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षा भूमीचाही विकास करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

देहूत येणे हे माझे भाग्य

देहू हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ आहे. अशा या देहूच्या पवित्र तीर्थभूमीवर मला येता आले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘जेथे नांदे देव पांडुरंग, धन्य ते क्षेत्रवासी लोक’, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे ,मारुतीबाबा कुरहेकर, आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते.

तुकोबांच्या शिकवणीनुसारच आमचे धोरण

मोदी म्हणाले, संत तुकाराम यांची शिळा केवळ शिळा नसून ती भक्तीची प्रेरणा आहे. या शिळेवर स्वत: तुकाराम महाराजांनी 13 दिवस तपस्या केली. त्यामुळे ही शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. तुकाराम महाराज यांच्या गाथांचे रक्षण करणारे सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांनाही मी नमन करतो. तुकाराम महाराज गरीब, श्रीमंत असा भेद मानत नव्हते. तसा भेदभाव करणे मोठे पाप असल्याचे तुकाराम महाराज म्हणत. सरकारदेखील तुकाराम महाराजांच्या याच शिकवणुनूसार सबका साथ ,सबका विश्वास या धोरणाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

भारत ही संताची भूमी आहे. समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम संतांनी सदैव केले आहे. भारतीय संस्कृती टिकवून ठेवत ती पुढे नेण्याचे काम संतांनी केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत तुकाराम महाराजांनी त्याग करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या अभांगानी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. सांस्कृतिक मूल्य आधारित त्यांच्या अभंगांनी समाजाला उर्जा दिली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

मोदी हे आपले वारकरी – फडणवीस

तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून सश्रद्ध समाज तयार करण्याचे काम केले. त्यांच्या शब्दांचे धन कोणीही बुडवू शकले नाही. इंद्रायणीने त्यांचे शब्द पुन्हा वर केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तुकोबांच्या जे का रंजले गांजले, या धर्मानुसारच पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान आपले वारकरी आहेत. वारकऱ्यात सारेच सेवक असतात. आपले पंतप्रधान प्रधानसेवक आहेत. संपूर्ण जग आपले आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. तेच मानून संपूर्ण जगाला लस पोहोचवण्याचे काम मोदीजींनी केले, असे फडणवीस म्हणाले.

या वर्षी सर्व संकल्प पूर्ण करण्याचे देशाचे लक्ष्य- नरेंद्र मोदी
पूर्ण देशात प्रसाद योजनेंतर्गत तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळाचा विकास केला जात आहे. भगवान राम यांच्याशी निगडित जे स्थळं आहेत त्यांचा रामायण सर्किटच्या रुपात विकास केला जातोय. या आठ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांचा विकास झाला आहे. आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेले महू असेल किंवा लंडमधील त्यांच्या घराचे स्मारकात रुपांतर मुंबईतील चैत्यभूमीचे काम, नागपूरमधील दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित करण्याचे काम असो किंवा दिल्लीमधील महापरिनीर्वाण झालेल्या ठिकाणी मेमोरियलचे निर्माण असेल हे पंचतीर्थ नव्या पिढीला बाबासाहेबांची ओळख करुन देत आहेत. संत तुकाराम म्हणायचे की योग्य दिशेने सर्वांचे प्रयत्न असतील तर अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवता येते. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशाने आपले संकल्प शंभर टक्के पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

शिवाजी महाराजांच्या जीवनात तुकाराम महाराजांनी महत्त्वाची भूमिका बजावली – मोदी
संत भिन्न परिस्थितीत समजाला गती देण्यासाठी पुढे येतात. शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकांना शिक्षा झाली. तेव्हा ते तुरुंगात तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. वेगवेगळा कालखंड वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मात्र या सर्वांसाठी संत तुकाराम यांची वाणी आणि उर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. आता आषाढामध्ये पंढरपूरची यात्रा सुरु होणार आहे. चारधाम यात्र असो, अमरनाथ यात्र असो या यात्रा आपल्यासाठी एक उर्जास्त्रोत आहेत. याच यात्रांच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेला जिवंत ठेवलेलं आहे. विविधता असताना भारत हजारो वर्षांपासून एका राष्ट्राच्या रुपात उजूनही उभा आहे. आपल्या राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्यासाठी आपेल काही कर्तव्य आहे. आपण आपली प्रचीन ओळख आणि परंपरा यांना चैतन्यपूर्ण ठेवलं पाहिजे.

पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक- मोदी
आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच मिळतोय. देश महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला जातोय. पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणेज समजात शेवटी बसलेल्या व्यक्तीला आपले समजून त्यांचे कल्याण करणे हेच संताचे लक्ष्य आहे. हाच देशासाठी संकल्प आहे. हाच संकल्प घेऊन देश पुढे जातोय. दलित, आदिवासी, मजूर यांचे कल्याण करणे ही प्राथमिकता आहे.

तुकाराम महाराजांचा उपदेश राष्ट्रभक्ती, समाजभक्तीसाठी महत्त्वाचा- मोदी
आज येथे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंग गाथेचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले. या सर्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या ५०० पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत. संत तुकाराम सांगायचे की समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे.

संत तुकाराम महाराजांचे अभंग उर्जा देतात- मोदी
संत तुकाराम महाराज यांच्यातील दया, करुणा तसेच सेवा त्यांच्या अभंगांच्या रुपात आजही आपल्यासोबत आहे. या अभंगांनी आपल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. ज्याचा भंग होत नाही. जो वेळेनुसार शास्वत आणि प्रासंगिक असतो तोच अभंग असतो. आज देश सांस्कृतिक मूल्यांवर पुढे जात आहे. यावेळी संत तुकाराम यांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहेत. मार्ग दाखवत आहेत. संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबाकाका, संत चोखामेळा यांच्या अभंगांमधून आपल्याला नव्यने प्रेरणा मिळते.

भारत जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे- मोदी
देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना आहे. भारत ही संतांची भूमी असल्यामुले हा देश शास्वत आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे. आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करतोय. संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे हे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केलं. भारताला गतीशील ठेवलं.

तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले- मोदी
आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्य केलेली असेल, जी शिळा तुकाराम महाराजांचे वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. या पवित्र स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे मी आभार व्यक्त करतो.

देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन – मोदी
देहूच्या या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचं रुप आहे. याच करणामुळे मी देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन करतो. मागील काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लागभले होते. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

मी भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना वंदन करतो- पंतप्रधान मोदी
नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना मी वंदन करतो. आज देहूच्या या पवित्र भूमिवर येण्याचं सौभाग्य लाभलं. हे स्थळ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीदेखील आहे.

तुकाराम महाराजांच्या शब्दांनी जनतेला व्यापून घेतलं- फडणवीस
ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला पण कळस झाले तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांनी सश्रद्ध आणि अंधश्रद्धेपासून दूर राहणारा समाज निर्माण केला. त्यांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती की ते कोणी मिटवू शकलं नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दांनी जनतेला व्यापून घेतलं.