महाराष्ट्राचा राजकीय पेच आता गुजरातमधून आसामकडे सरकणार आहे. शिंदे यांच्यासह 40 बंडखोर आमदार सुरतहून विशेष विमानाने गुवाहाटीत पोहोचले आहेत. सुरत विमानतळावर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यासोबत एकूण 40 आमदार आहेत, त्यापैकी 34 शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आहेत.
सुरतमध्ये असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे शिवसेनेच्या 35 आमदारांना गुवाहटी (आसाम) येथे नेण्यात आले आहे. विमानतळावर भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत दिसले आहेत.
- एकनाथ शिंदे यांनी गुहाटीत दाखल झाले असून, आज दुपारी ते विशेष विमानाने मुंबईत येणार आहेत
- सुरतला पोहोचलेल्या सेना आमदारांची यादी
1. एकनाथ शिंदे – कोपरी 2 अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद 3. शंभुराज देसाई – पाटण, सातारा 4. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद 5. भरत गोगावले – महाड, रायगड 6. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला 7.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली 8.विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम 9. लता सोनवणे- चाेपडा 10. संजय गायकवाड – बुलडाणा 11. संजय रायमूलकर – मेहकर 12. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा 13. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर 14. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर 15 संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ 16. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद 17. तानाजी सावंत – परंडा, उस्मानाबाद 18. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम 19. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद 20. श्रीनिवास वनगा, पालघर 21. बालाजी कल्याणकर -नांदेड 22. बालाजी किणीकर- अंबरनाथ 23. सुहास कांदे -नांदगाव 24. महेंद्र दळवी- अलिबाग 25. प्रकाश सुर्वे -मागाठणे 26. महेंद्र थोरवे -कर्जत 27. शांताराम मोरे -भिवंडी 28.किशोर पाटील- पाचोरा 29. चिमणराव पाटील- एरंडोल 30. प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद
उद्धव ठाकरेंच्या संपर्कातील आमदार :
1. वैभव नाईक
2. उदयसिंह राजपूत
3. रवींद्र वायकर
4. राहुल पाटील
5. उदय सामंत
6. प्रकाश फातर्पेकर
7. सुनील प्रभू
8. गुलाब पाटील
9. भास्कर जाधव
10. संतोष बांगर 11. आदित्य ठाकरे 12. राजन साळवी 13. अजय चौधरी 14. दिलीप लांडे 15. सदा सरवणकर 16. दादा भुसे 17. संजय पोतनीस 18. सुनील राऊत 19 कैलास पाटील 20. दीपक केसरकर 21.यामिनी जाधव 22. रमेश कोरगावकर 23. योगेश कदम 24. मंगेश कुडाळकर 25 प्रताप सरनाईक यापैकी काही आमदार शिंदेंच्या संपर्कात
भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत
भापजचे मुंबईतील उत्तर भारतीय नेते मोहित कंबोज हे नुकतेच सुरत विमानतळावर दाखल झाले आहेत. सर्व बंडखोर आमदारांसोबत जपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे दिसले आहेत. त्यामुळे या सर्व बंडाळीच्या मागे भाजपचा हात असल्याचे बोलल्या जात आहे.

बंडखोर शिवसेना नेते आमदार एकनाथ शिंदेंची यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसैनिकांनी कुठलही बंड केलं नाही. कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. बाळासाहेबांच्या विचारांपासून फारकत घेणार नाही. हिंदूत्व कधी सोडणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झाली आहे. गर्व से कहो हम हिंदू है. अशी प्रतिक्रिया त्यांनी सुरत विमानतळावर दिली.

बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसोबत कोण ?
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणते आमदार आहेत ? हा प्रश्न कायम होता. त्याचे उत्तर मिळाले असून बंडखोर आमदारांचा एक समूह फोटो आताचा समोर आला आहे. त्यात शिंदेंसह 35 आमदार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यात प्रहारचे आमदार बच्चू कडू देखील आहेत.

राऊतांनी केलेल्या तक्रारीची गृहमंत्र्यांनी घेतली दखल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदारांना सुरतमध्ये मारहाण केल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याची राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतली असून, या सर्व प्रकारची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
नितीन देशमुख यांची प्रकृती खालावली
सुरतला आलेल्या महाराष्ट्रातील ३० हून अधिक शिवसेना आमदारांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. नितीन देशमुख यांची बाळापूर (अकोला) येथे प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी सुरत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.सकाळी 4 वाजता सिव्हिलला आणण्यात आल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्येही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सध्या नितीन देशमुख यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीतील एका विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती बरी आहे.
भाजपशी युती केल्यास शिवसेना फुटणार नाही- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमूख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबईत येऊन भेटण्यास सांगितले आहे; पण शिंदे यांनी भाजपसोबत युतीची अट ठेवली असून, याबाबत प्रथम आपली भूमिका स्पष्ट करा असे ठाकरे यांना ठणकावले. तसेच भाजपसोबत युती झाली तर शिवसेना फुटणार नाही असा सुचक इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडून जोरदार धक्का दिला आहे. शिंदे यांनी 30 आमदारांसह सुरत गाठले असून आता उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अटच मुख्यमंत्री ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.
दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 15 शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि 14 अपक्ष आमदार सुरतला गेले असून या गटात आणखी 3 मंत्री असून एकूण 30 आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.
शिंदे-मुख्यमंत्री ठाकरेंची फोनवरून चर्चा
मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर नार्वेकर यांच्या फोनवरुन एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंशी सुमारे पंधरा चर्चा झाली आहे. परंतू नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.
शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?
- एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यात संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली. शिंदेंचा गैरसमज झाला असे राऊत एकीकडे म्हणतात तर दुसरीकडे शिंदेंनी आमदारांचे अपहरण केले असे म्हणतात अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
- मी शिवसेनेविरोधात बोललो नाही, स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा केली नाही. पक्षांतर केले नाही ना भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कागदावर सही केली नाही मग मला गटनेते पदावरुन का काढले? असा सवालही शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
- मला मंत्रीपदाची लालसा नाही. पण भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी मागणी करीत पुढे काय करायचे ते लवकरच अधिकृतपणे कळवणार आहे असे ठाकरेंना शिंदे म्हणाले.
राज्यात राजकीय घडामोडींनी वेग
एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्रामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील काँग्रेसही अलर्ट मोडवर असून त्यांचेही आमदार फुटण्याची भिती व्यक्त होत आहे. याच धर्तीवर काँग्रेसने त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. तर वर्षा बंगल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेची आणि महाविकास आघाडीचीही तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे मातोश्रीवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली आहे.
भाजपशी युती करा- शिंदेंची अट
एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडून भाजपसोबत युती करण्याची अट ठेवल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसायचे असल्याचेही बोलले जात आहे. शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे या तीन आमदारांनाही मातोश्रीवर पाठवले आहे. या बैठकीत काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
एकनाथ शिंदेंच्या या आहेत अटी
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती करा
- काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोडावे त्यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले
- मीच गटनेता राहणार
काय आहे प्रस्ताव?
एकनाथ शिंदे यांच्यांशी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे यांनी संपर्क साधला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी एकनाथ शिंदे यांची आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत, तर उपमुख्यमंत्री आपली वर्णी लागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केल्याचे समजते.
शिंदे अन् देशमुखांमध्ये खडाजंगी
नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये 30 हून अधिक आमदार असल्याचे समजते. त्यात बाळापूर (अकोला) येथील आमदार नितीन देशमुख आहेत. देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येऊन बसले. मात्र, वाहन नसल्याने ते पंधरा मिनिटे तिथेच बसून राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कट अधिक गडद
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकट अधिक गडद झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातला गेले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या 15 आमदारांचा समावेश आहे, तर 10 अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेत सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे शिंदे नाराज झाले असून, काल संध्याकाळपासून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव यांचा फोनही उचलला नाही. मुंबईत शिवसेनेने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.
आकडेवारीचे गणित
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत 151 वर घसरले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 162 आमदार होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी ही संख्या 170 होती. म्हणजेच राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची संख्या 10 पेक्षा कमी झाली. विधान परिषदेनंतर एकूण 19 आमदार महाविकास आघाडीपासून दूर गेले. दुसरीकडे, भाजपला आता 134 आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार टिकण्यासाठी 144 चे बहुमत आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या आकड्यांमधील फरक खूपच कमी आहे.
पक्षांतर बंदी कायदा
विधानसभेत शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत. कायद्यानुसार शिंदे यांना 2/3 आमदार म्हणजे 37 आमदार जमवायचे असतील. सध्या शिंदे यांच्याकडे एकूण 29 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना आणखी 8 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
का झाले नाराज?
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे काही आमदार देखील गुजरातला आहेत. ते सुरतच्या ली-मेरिडिअनमध्ये हॉटेलमध्ये थांबल्याचे समजते. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतल 13 आमदार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील अनेक जण काल संध्याकाळपासून शिंदेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते फोन घेत नाहीत. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची व्यूहरचना आखताना एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज झाल्याचे समजते. शिवसेनेत आपल्याला किंमत दिली जात नाही. आपण डिस्टर्ब आहोत, असे सोमवारी सांयकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले होते. त्यानंतर फोन बंद करून ते सुरतकडे निघाले.
डीपीवर शिंदेंचा फोटो
बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. जय रायमूलकर यांनी काहीवेळापूर्वीच व्हॉट्सअॅपच्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे सांगितले जात आहे.
मंत्री देसाईही सोबत
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील पाटणचे शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु तेही नॉट रिचेबल असून, एकनाथ शिंदे यांच्या समवेतच असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेसह मराठवाड्यातले सहा आमदार देखील नॉट रिचेबल आहेत. त्यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, संजय शिरसाट, माजी वनमंत्री संजय राठोड हेही नॉट रिचेबल आहेत.