36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू, बंडखोरांना पत्र

बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू, बंडखोरांना पत्र

0
42

blank

मुंबई,दि.22ः- बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे.

काय म्हटलंय पत्रात? 

पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. 22 जून, 2022 रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई 400006 येथे सायंकाळी 5 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस. एम. एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.

blank