राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्याचे आता निश्चित मानल्या जात आहे. त्याचे चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राजकीय उलथापालथीच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेच्या 41 आमदारांसह 50 आमदार गुवाहाटीत पोहोचले आहेत. शिंदेंना आपला स्वत:चा वेगळा गट करण्यासाठी केवळ 37 आमदारांची गरज आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या 19 पैकी 9 हून अधिक खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर गटाचे एकनाथ शिंदे लवकरच आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी काल रात्री शासकीय निवासस्थान वर्षा सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.
राष्ट्रवादीने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवार आणि सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील राजकीय गदारोळाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. बंडखोरी करणाऱ्या आमदाराला 5 वर्षे निवडणूक लढवण्यास मनाई करावी, असे काँग्रेसने न्यायालयाला सांगितले आहे.
लाईव्ह अपडेट:
- एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर ममतांच्या टीएमसी कार्यकर्त्यांचे आंदोलन
- एकनाथ शिंदेंना भाजपकडून मोठी ऑफर: राज्यात 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री पद तर केंद्रात 3 मंत्रीपद -सुत्र
- राजीनामा देण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12.30 वाजता मंत्रालयातील सर्व सचिवांचे आभार मानणार.
3 मोठे अपडेट्स…
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 11.30 वाजता पक्षाच्या बड्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. ठाकरे राजीनामा देण्याची घोषणा करू शकतात.
2. शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी सुमारे 9 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि नागपूरचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांची नावे पुढे आली आहेत.
3. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी मुंबईत पोहोचल्या आहेत. मात्र, ही त्यांची वैयक्तिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
राजकीय संकट व्यंगचित्रातून


फडणवीसांचे पोस्टर लावले
राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या दिग्गज नेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. बैठकीत राजीनाम्याबाबत निर्णय होऊ शकतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
आणखी 3 आमदार दाखल
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाचे दुसरे केंद्र असलेल्या गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे आणखी तीन आमदार पोहोचले आहेत. आशिष जैस्वाल, दीपक केसरकर, सदा सरवणकर, योगेश कदम, मंजुळा गावित, मंगेश कुलवडकर, संजय राठोड हे गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आमदारांची भेट घेऊन स्वाक्षरी केलेले पत्र राजभवनाला पाठवू शकतात.
राजकीय भुकंपावर 2 मोठी वक्तव्ये…
1. संजय राऊत म्हणाले – उद्धव ठाकरे यांच्याकडे अजूनही पूर्ण बहुमत आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला फ्लोअर टेस्ट घेण्याची संधी मिळेल तेव्हा आम्ही ते सिद्ध करू.
2. गौरव गोगोई म्हणाले – आसाममधील लोक पुरामुळे त्रस्त आहेत. मात्र त्यातून तेथील नागरिकांची सुटका करण्याऐवजी हिमंता सरकार महाराष्ट्रात सरकार पाडण्यात मग्न आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता पर्याय काय?
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता 2 पर्याय शिल्लक आहेत. शरद पवारांच्या म्हणण्यानूसार, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर द्या. मात्र, शिंदे यांनी महाविकास आघाडीसोबत सरकारमध्ये राहण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्याकडे फ्लोअर टेस्टचा दुसरा पर्याय आहे.
दुसऱ्या दिवशी काय झाले?
राजकीय उलथापालथ होत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा सोडले. फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरे म्हणाले की- एकनाथ शिंदे तुम्ही माझ्याशी बोला, मी मुख्यमंत्रीपदासह शिवसेना अध्यक्षपद सोडणार आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच करा, पक्ष कोसळण्यापासून वाचेल, असा सल्ला दिला.
शिवसेनेच्या खासदारांचीही खंडखोरी
आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे 19 पैकी 9 खासदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि नागपूरचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हे गुवाहाटीला दाखल झाले आहेत. सत्ता परिवर्तन होताच आणखी अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडले