प्रेयसीसोबत हॉटेलात गेला, रूममध्ये घडली हादरवणारी घटना

0
190

गोंदिया- राज्यात दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना, जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या एका प्रियकरानेविष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरील प्रकार हा शहरातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये घडला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या हॉटेलमधील ही तिसरी घटना असून यापूर्वीही अशा दोन घटना उडकीस आल्या होत्या. शतक जांगडे (वय 23 रा. आंबाटोली फुलचुर) असं विष प्राशन केलेल्या तरुणाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शतक हा त्याच्या प्रेयसीसोबत शहरातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेला. दोघांनी रूमही बुक केली. मात्र, हॉटेलच्या रूममध्ये त्याचे प्रेयसीसोबत काही कारणावरून वाद झाले.

दोघांमधील वाद हा इतका विकोपाला गेला की, शतक याने सोबत सोबत आणलेले विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जेव्हा हा सर्व प्रकार हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने शतक याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

विशेष बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमधील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही तिसरी घटना असून या हॉटेलात घडत असलेल्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. नेमकं या हॉटेलात घडतंय तरी काय असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला असून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी, इतक्या टोकाचा निर्णय कधीच घेऊ नका, आत्महत्या हे त्यावरील सोल्यूशन नाही. आत्महत्या ही पळवाट असून तसं केल्याने प्रश्न सुटत नाही. उलट अनेक प्रश्न निरुत्तरीत राहून जातात. त्यामुळे आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन नेहमी केलं जातं.