♦ ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर
♦ ७६७५ ग्रामपंचायतीवर प्रशासक
♦ राज्य निवडणूक आयोगाचं ग्रामविकास विभागाला पत्र
मुंबई : राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळं राज्यातील या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे सुमारे ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणेकरीता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळं ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जश्या संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला लिहिलेल्या पत्रात कोविड- १९ आजाराबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध रिट याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका टप्या-टप्याने घेण्यात आल्या आहेत. आता राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्यानं राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाल पत्र लिहून प्रशासक नेमण्याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुदत संपेल त्यानुसार प्रशासक नेमले जाणार
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जश्या संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी.
प्रशासक नियुक्ती होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
ठाणे : ५८
पालघर : ६३
रायगड : २४०
रत्नागिरी : २२२
सिंधुदुर्ग : ३२५
नाशिक : १९६
धुळे : १०८
जळगाव : १४०
अहमदगर :२०४
नंदुरबार : ६५
पुणे : २१९
सोलापूर :१८९
सातारा : ३१५
सांगली : ४५२
कोल्हापूर : ४७५
औरंगाबाद : २१५
बीड : ७०४
नांदेड : १७६
उस्मानाबाद : १६६
परभणी : १२६
जालना : २६६
लातूर : ३५१
हिंगोली : ६२
अमरावती : २६३
अकोला : २६६
यवतमाळ : ९९
बुलडाणा : २७९
वाशिम : २८७
नागपूर २३७
वर्धा : १११
चंद्रपूर :५६
भंडारा : ३६२
गोंदिया : ३४५
गडचिरोली : २७