संघाचा दसरा मेळावा:केवळ शाळा-महाविद्यालयांतून संस्कार होत नाही, मातृशक्तीचा सन्मानही आवश्यक; मोहन भागवत

0
19

नागपूर -डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आरएसएसच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग आहे. अनसूया काळे यांच्यापासून अनेक महिलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. आपल्याला निम्म्या लोकसंख्येला सन्मान आणि योग्य सहभाग द्यायचा आहे. ‘माणूस जे काही करू शकतो, ते सर्व काम मातृशक्तीनेही होऊ शकते. पण स्त्रिया करू शकतील असे सर्व काम पुरुष करू शकत नाहीत. महिलांशिवाय समाजाची पूर्ण शक्ती समोर येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे आयोजित दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांद्वारे, नेत्यांच्या माध्यमातून, मुलांना मूल्ये प्राप्त होतात. केवळ महाविद्यालयांतून संस्कार मिळत नाहीत. केवळ शालेय शिक्षणावर अवलंबून राहू नये. याचा सर्वाधिक परिणाम घरातील वातावरण, समाजाच्या वातावरणावर होतो. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत खूप चर्चा होत आहे, पण आपल्याच भाषेत शिक्षण घ्यायचे आहे का? इंग्रजीमुळे रोजगार मिळतो असा भ्रम आहे. वास्तवात असे नसल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्यातील अंतर वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देशात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. कुणाला कसलीही भीती राहु नये, शिस्त राहु नये, असे प्रयत्न नेहमीच सुरू असतात. त्यांना आपल्यात प्रवेश घेता यावा, म्हणून ते आपल्याशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करतात. पंथ, जातीच्या नावावर आपले हितसंबंधी असल्याचे भासवतात. वास्तविक ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जवळ येतात. या माध्यमातून मोहन भागवत यांनी इस्लामिक कट्टरतावादी संघटना PFI विरोधात केलेल्या कारवाईकडे लक्ष वेधले. ‘समाजाने भोळेपणाने चालू असलेल्या कृतींमध्ये अडकू नये.’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.