विदर्भात गोंदिया सर्वात थंड,6.8 अंश सेल्सीअस तापमान

0
38
गोंदिया,दि.08ः : मागील चार दिवसा पासून विदर्भात सर्वात कमी तापमान जिल्ह्यात नोंदविले गेले आहे. आज 8 जानेवारीला 6.8 अंश सेल्सीअस तापमान नोंदवले गेले असून सकाळच्या सुमारास गोंदियाकर जणू काही गोरठले गेले अशाच आभास व्हायचा.नागपूर 8 अंश सेल्सीअस,गडचिरोली व वर्धा 9.4,ब्रम्हपुरी 9.6 अंश सेल्सीअस तापमान नोदंवले गेले आहे. 7 जानेवारी रोजी 7 अंश सेल्सीअस तर 6 जानेवारी रोजी 11.8 अंशअं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर सूर्यनारायणने दर्शन दिले असले तरी तापमान कायम असल्याने जिल्हावासीयांना हुडहुडीचा सामना करावा लागला. मागील काही दिवसापासूनसू देशासह राज्यातील अनेक भागात तापमान घसरले आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान 15 अंश सेल्सिअसच्या जवळपास असले तरी मागील काही दिवसापासून जिल्ह्याचे तापमान 13 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहिले आहे.