38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पोलिस दलातर्फे रेझिंग डे निमित्त पथसंचलन

पोलिस दलातर्फे रेझिंग डे निमित्त पथसंचलन

0
28

blank

गडचिरोली,दि.08- २ जानेवारी महाराष्ट्र पोलिस स्थानादिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारीपर्यंत गडचिरोली दलाच्यावतीने रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. या कालावधील पोलिस दलाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. आज ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थित पोलिस दलाचे पथसंचलन पार पडले.
सदरचे पथसंचलन गडचिरोली शहरातील कारगील चौकापासून सुरू होऊन इंदिरा गांधी चौक ते बस स्थानक येथून परत इंदिरा गांधी चौकात सांगता करण्यात आली. या पथसंचलनात पोलिस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, वाहतूक नियम या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली. पथसंचनामध्ये ध्वजवाहक, पोलिस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटून, बॅंड पथक, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटून, श्‍वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी बॅंड पथकाच्या देशभक्तीपर धूनवरती शिस्तबद्ध पथसंचरलन केले. पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन, पोलिस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हीक अँक्शन, प्रोपागंडा, श्‍वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोला सेल आदी शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच विद्याभारती कन्या हायस्कूल, फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, शिवाजी ज्युनियर सायन्स कॉलेज व महिला महाविद्यालय गडचिरोली येथील २५0 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला होता.
पथसंचलनामध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, धानोराचे एसडीपीओ स्वप्नील जाधव, गडचिरोली ठाणेदार अरविंद कतलाम, राखीव पोलिस निरीक्षक विठ्ठल मुत्यमवार उपस्थित होते.

blank