Home Top News हे उशिरा सूचलेले शहानपण; नव्या राज्यपालांनी कोश्यारींच्या चुका लक्षात घ्याव्यात – संभाजीराजे

हे उशिरा सूचलेले शहानपण; नव्या राज्यपालांनी कोश्यारींच्या चुका लक्षात घ्याव्यात – संभाजीराजे

0

मुंबई-राज्यपालाबद्दल 2 महिन्या अगोदर निर्णय घ्यायला हवा होता असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. तर हा उशिरा सूचलेला शहानपणा असल्याचा टोलाही संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला आहे. तर नव्या राज्यपालांनी कोश्यारींच्या चुका लक्षात ठेवायला हव्यात आणि नव्या राज्यपालांनी राज्याची किर्ती सर्व राज्यापर्यंत पोहचवावी असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आता यानंतर कुणी चुकला तरी त्याला ठोकणारच, राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने आम्ही काही गोष्टी थांबवल्या. मात्र, आता कुणी जर असे बोलले तर स्वराज्य संघटना ठोकणार असेही त्यांनी म्हटले आहे. 2007 पासून चळवळीत खूप कामे केली पण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत यावेच लागेल असे म्हणत स्वराज्य संघटना 101 टक्के राजकारणात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. राज्याची सुस्कृंतपणाची ओळख होती, ती घडी राज्यपालांनी मोडली. नवे राज्यपाल आलेत त्यांना मनापासून शुभेच्छा देताना, महाराष्ट्र हा महापुरुषांचा आदर्श घेऊन चालते, त्यांनी महाराष्ट्राची परंपरा बाहेर नेण्याची नव्या राज्यपालांची जबाबदारी आहे.

राऊतांची अपेक्षा

भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिले. मात्र यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यावर केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव होता. मात्र आता नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. अशी अपेक्षा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

इज्जत वाचवण्याचा प्रयत्न

अमोल मिटकरी म्हणाले, उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपला कळल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप मुख्यालय बनवू नका

संजय राऊत म्हणाले, नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्या नावात बैस आहे की बायस माहित नाही. मात्र नवीन राज्यपालांचे आम्ही स्वागत करु. मात्र त्यांनी घटनेनुसार काम करावे. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे, राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. बैस हे सुस्वभावी आहेत. मात्र विरोधी पक्षाचा आवाज त्यांनी ऐकावा. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, न्यायालयात याची सुनावणी सुरु आहे. त्यांचे कोणते निर्णय मान्य करावे कोणते नाही, याचे भान त्यांनी ठेवावे.

Exit mobile version