घराच्या अंगणातून चार वर्षीय बाळाला उचलून वाघ जंगलात पळाला

0
60

चंद्रपूर : सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील  बोरमाळा या गावातून हर्षल संजय कारमेगे या चार ते पाच वर्षीय बालकाला वाघ घराच्या अंगणातून उचलून जंगलात घेऊन गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन खाते तथा पोलिस विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले आहे.हर्षल हा घराच्या अंगणात बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास असताना तिथे वाघ आला व हर्षलला जंगलात घेऊन गेला. येथे चार ते पाच वर्ष वयोगटातील बालकाला वाघाने उचलून नेल्याची घटना आधीही घडली आहे. संजय कारमेगे यांचा मुलगा वाघाने घरासमोरून उचलून नेल्याचे सांगण्यात येत आहे. आईसमोरच वाघाने हल्ला करून उचलून नेल्याने आईने आरडाओरड केली. परंतू, वाघ बाळाला घेऊन पसार झाला. पोलीस अधिकारी तसेच वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी लगेच गावात दाखल झाले. वन अधिकारी व गावातील लोक यांच्या साह्याने बाळाचा शोध घेणे सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत बाळाचा शोध लागला नव्हता, असे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे ग्राम पंचायत सदस्य विजय कोरवार यांनी सांगितले.