Home Top News नक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवुन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक

नक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवुन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक

0
file photo

गोंदिया -नक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवुन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला गोंदिया पोलिसांच्या नक्षली सेलने अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या पोलिस स्टेशन केशारी अंतर्गत नागनडोह जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.त्याच्याजवळून एक डेटोनेटर आणि एक जिलेटीनची कांडी जप्त करण्यात आली आहे. किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (३१, रा. खारकाडी, पो. हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली ), असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो टीपागड दलमचा सक्रिय सदस्य असून, २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांवर मरकेगाव, हत्ती गोटा येथे केलेल्या हल्ल्यात आणि २०११ मध्ये खोब्रामेंढा गोळीबार, मुरुमगाव येथील हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. सदरची  कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सपोनि. संजय नाईक, पोउपनि श्रीकांत हत्तीमारे, पोहवा. भैय्यालाल किन्नाके , मुस्ताक सैय्यद, लक्ष्मण घरत, सुरेंद्र हिचामी, पोशि. आशिष वंजारी, पोना. उमेश गायधने, मोनेश तुरकर, यांनी केलेली आहे.

पोलीस प्रशासनास सहकार्य करणाऱ्याचे व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येवुन प्रशासना तर्फे बक्षीस देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे नक्षलवादी चळव ळीत सामील असलेल्या नक्षलवाद्यांना देखील प्रशासनव्दारे असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी घातपात व हिंसेचा मार्ग सोडुन आत्मसमर्पण करावे. व शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या बक्षिसाची रोख रक्कम, तसेच विविध सुख-सुविधांचा लाभ घेऊन समाजाच्या मुख्यप्रवाहात समाविष्ट होऊन आपले जिवन सुखी- समृद्ध करावे.

Exit mobile version