साकोली घनकचरा व्यवस्थापन केंद्रास जिल्हाधिकारी यांची भेट

0
12

भंडारा, दि. 3 :   वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा सोबतच घनकचरा व्यवस्थापन गरजेचे असून साकोली येथील घनकचरा व्यवस्थापन व मल निसारण केंद्रास आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शहर स्वच्छ राहण्यासाठी कचरा व्यवस्थापन गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. आज सकाळी साकोली येथील नगर परिषदेच्यान कामाचा आढावा त्यांनी   घेतला तसेच यावेळेस तेथील घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण केंद्रास भेट देवून पाहणी  केली.

यावेळी नगरपरिषद भंडाराचे मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरपरिषद तुमसरचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नगरपरिषद पवनीचे मुख्याधिकारी विवेक मेश्राम व नगरपरिषद लाखांदूरचे सौरभ कावळे उपस्थित होते. नगरपरिषदेच्या सभागृहात चित्रफितीद्वारे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी नगरपरिषदेतील अधिकारी श्री. रामटेके व स्वप्नील हमाने यांनी घनकचरा व मल निसारण प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. श्री. कुंभेजकर यांनी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

साकोली नगरपरिषदेची स्थापना 14 जुलै 2016 मध्ये झाली असून साकोली शहराचे एकूण क्षेत्रफळ 13.88 चौ.कि.मी आहे. येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्र 5 एकरमध्ये असून शहराची लोकसंख्या 24 हजार 890 आहे तर येथे एकूण 6 हजार 933 घरे आहेत.