राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, सोमवारी चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश

0
9

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे शरद पवारांना शह देण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर आता ईडीची नजर असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे. याआधी देखील विरोधकांनी ईडीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधकांना कमजोर करण्यासाठी सरकारकडून ईडीचा अस्त्रासारखा वापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांसह अनेकांनी केला आहे.

IL & FS प्रकरण

जयंत पाटील यांना IL & FS प्रकरणात ही ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. सोमवारी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा आज निकाल लागणार आहे. आणि त्याआधीच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ही बातमी समोर आल्याने या कृतीमागील अर्थ विरोधकांकडून शोधला जात आहे.