Home Top News प्रफुल्ल पटेलांना भ्रष्ट्राचार प्रकरणात सीबीआयची क्लीनचीट

प्रफुल्ल पटेलांना भ्रष्ट्राचार प्रकरणात सीबीआयची क्लीनचीट

0

नवी दिल्ली : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात सीबीआयनं याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला.सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरु होता.

या प्रकरणी सीबीआयनं आता आपला क्लोजर रिपोर्ट दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केला. टीव्ही ९ नं याबाबत वृत्त दिलं आहे.

Exit mobile version