मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा (Election 2024) आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी (ATM) पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, असेही राजीव कुमार यांनी म्हटलं.
राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.
राज्यांत एकूण पोलिंग स्टेशन 1 लाख 186 असणार आहेत.
शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. 350 असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिपाणीमुळे फटका,चिन्हाबाबत कोणता निर्णय घेणार?
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणी या चिन्हामुळे फटका बसल्याच आरोप सातत्याने करण्यात येत होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी असा गोंधळ होऊ नये याबाबत कोणता निर्णय घेणार? असा सवाल निवडणूक आयोगाला पत्रकारांनी विचारला होता. याबाबत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भाष्य केलं आहे.
“चिन्हबाबत ऑर्डर आम्ही दिली आहे. त्याला देखील कोर्टात चॅलेंज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी यावर बोलणार नाही”, अशी प्रतिक्रिया राजीव कुमार यांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर आयोगाने महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन दिवस महाराष्ट्रातील प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं.
मोबाईल सोबत असल्यामुळे अनेकांना मतदान करता आलं नव्हतं
राजीव कुमार म्हणाले, अन्य उत्सवांप्रमाणे महाराष्ट्राची जनता निवडणुकीचा उत्सवही देखील स्वागत करेल. मागील 2 दिवस आम्ही सगळ्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्षासोबत आमची चर्चा झाली. बीएसपी, एनसीपी, सारख्या 11 पक्षांसोबत चर्चा झाली. दिवाळी आणि छट पूजा लोकांचे सण विचारात घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात अशी या पक्षांनी विनंती राजकीय पक्षांनी केली. पक्षांनी अशी देखील विनंती केली की, लोकसभा निवडणुकीत मोबाईलसोबत असल्यामुळे अनेकांना मतदान करता आलं नव्हतं. त्यामुळे विधानसभेला याचा विचार व्हावा. मतदानासाठी जाताना मोबाईल परवानगी नाही. माञ सोबत जर मतदार मोबाईल घेऊन गेला असेल तर तो ठेवण्याची व्यवस्था करावी.
पैशाच्या गैरवापर थांबवण्याबाबतही राजकीय पक्षांनी भाष्य केलं
पुढे बोलताना राजीव कुमार म्हणाले, फेक न्यूज वाढत आहे त्याचा बंदोबस्त करण्याबाबत देखील सांगण्यात आलं. शिवाय निवडणुकीत होत असलेल्या पैशाच्या गैरवापर थांबवण्याबाबतही राजकीय पक्षांनी भाष्य केलं. सध्या >महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री 4.64 कोटी आहेत. थर्ड जेंडरचे 5997, दिव्यांग 6.32 लाख मतदार आहेत. पहिल्यांदा मतदान करणारे मतदार 19.48 लाख मतदार असणार आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये वाढ झाली आहे. राज्यांत एकूण 1 लाख 186 पोलिंग स्टेशन असणार आहेत. त्यातील शहरी भागात 42 हजार 585 तर ग्रामीण भागात – 57 हजार 601 असतील. निवडणुकीवेळी काही ठिकाणी तरूण अधिकारी बूथ मॅनेज करतील, असे 350 बूथ असतील.
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल. जो सभेसाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज करेल त्याला मैदान देण्याची संधी दिली जाईल.
लोकसभेला इथं मतदान कमी
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान क्षेत्र असेलल्या कुलाबा, कल्याण, कुर्ला, मुंबादेवी इथ मतदान कमी झालं आहे. गडचिरोली येथे 73 टक्के मतदान झालं, मग कुलाबा कल्याण येथे मतदानाचा टक्का वाढायला हवा. इथल्या मतदारांनी विचार करायला हवा,असेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
या अॅपवर तक्रार करता येणार
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक काळात एटीएम व्हॅनला निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल.