महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल

0
430

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यात महाराष्ट्रात (Maharashtra) एकाच टप्प्यात २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी 1 लाख 186 मतदान केंद्र असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. तसेच महाराष्ट्रात 9 कोटी 3 लाख मतदार आहेत. याशिवाय आगोगाने 85 वर्षांवरील नागरिकांना घरून मतदान करता येणार आहे.

निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होटरॲप वरून मतदार सर्व माहिती तपासू शकतात. तसेच तुमचा उमेदवार कोण आहे हे देखील तपासता येणार आहे. याशिवाय पैसे, मद्य, ड्रग्ज यावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व पोलिंग स्टेशन 2 किमीच्या आत असावेत.

तर असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक :

निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

– राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

महाराष्ट्राच्या निवडणुकीचे असे आहे वेळापत्रक

  • निवडणुकीचे नोटिफिकेशन : २२ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर
  • अर्जांची तपासणी : ३० ऑक्टोबर २०२४
  • अर्ज मागे घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर
  • मतदान : २० नोव्हेंबर २०२४
  • मतमोजणी : २३ नोव्हेंबर २०२४
  • एकूण मतदार – ९ कोटी ३ लाख
  • नव मतदार – २०.९३ लाख
  • पुरूष मतदार – ४.९७ कोटी
  • महिला मतदार – ४.६६ कोटी
  • युवा मतदार – १.८५ कोटी
  • तृतीयपंथी मतदार – ५६ हजारांहून जास्त
  • ८५ वर्षावरील मतदार – १२. ४८ लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार – ४९ हजारांहून जास्त
  • दिव्यांग मतदार – ६.३२ लाख

– महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र

– १ लाख १८६ पोलिंग स्टेशन असणार

– महाराष्ट्रातील जिल्हे ३६ आहेत

– एकूण मतदार संघ २८८

महाराष्ट्रात २८८ पैकी २३४ जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.

तर झारखंडमध्ये २४ जिल्हे आहेत. यात एकूण ८१ जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. यातील २८ जागा या एसटी प्रवर्ग आणि ९ जागा या एससी प्रवर्गासाठी राखीव असतील. झारखंड विधानसभेचा कार्यकाल ५ जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात २.६ कोटी मतदार आहेत. यात १.२९ कोटी महिला तर १.३१ कोटी पुरुष मतदार आहेत.