बारावीचा निकाल उद्या सोमवारी ५ मे रोजी होणार जाहीर..विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

0
217

पुणे:-:-राज्यातील बारावीचा निकाल उद्या सोमवारी ५ मे रोजी जाहीर होणार आहे.महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार,महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल सोमवारी‌ ५ मे रोजी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वरून गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल ५ मे २०२५ जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे.अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल. विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.

परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. याशिवाय, विद्यार्थी इतर अधिकृत पोर्टलवर देखील त्यांचे निकाल तपासू शकतील.
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com

सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.

⭕⭕ *होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
⭕⭕ *तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
*⭕⭕तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांच्यासाठी मंडळाने एक महत्त्वाची अट घातली आहे. “फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.” याचा अर्थ, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स घेणे आवश्यक आहे.

यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली होती. ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत सुरळीतपणे पार पडली होती. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यानंतर आता नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Maharashtra HSC 12th result) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बोर्डाद्वारे निकालाची तयारी पूर्ण झाली असून, तो सोमवारी निश्चित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.

*निकाल कुठे पाहाल?*
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in