नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करताना मंगळवारी रात्री दीड वाजता ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. तीनही सैन्य दलांचे हे एकत्रित ऑपरेशन होते. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना लक्ष्य केले होते.
भारताच्या स्ट्र्राईकनंतर पाकिस्तानचे उत्तर
भारताच्या एअरस्ट्राईकवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विधान समोर आले आहे. शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की पाकिस्तानच्या जमिनीवर पाच ठिकाणी हल्ले करण्यात आले. पंतप्रधान शरीफ म्हणाले, पाकिस्तानला या कृत्याचे शक्तीशाली उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याचे उत्तर दिले जात आहे .
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरू झाला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निर्दोष लोकांचा बळी गेला होता. यानंतर भारताने सिंधु जल संधीला स्थगिती दिली होती. पाकिस्तानचे पाणी भारताने रोखले होते. तसेच अनेक वेळ भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याला उत्तर दिले जाईल अशी शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारवाईसाठी लष्कराला फ्री हँड दिला होता.
भारताच्या गुप्तचर विभागाने सर्व टार्गेटची ओळख केली होती. यानंतर संपूर्ण प्लानिंगसह लष्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि आंतरराष्टीय सीमेपासून किती दूर आहेत ही ठिकाणे…
बहावलपूर – आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी दूर स्थित आहे. येथे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. हा तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केला आहे.
मुरीदके – हे दहशतवादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेपासून ३० किमी अंतरावर आहे. येथे लष्कर ए तौयबाचे शिबीर होते. याचा संबंध २६/११ मुंबई हल्ल्याशी होता
गुलपूर – हे दहशतवादी ठिकाण locपासून ३५ किमी अंतरावर आहे.
लष्कर कँप सवाई – हे दहशतवादी ठिकाणी पीओके तंगधार सेक्टरच्या आत ३० किमी आहे.
बिलाल कँप – जैश ए मोहम्मदचे लाँच पॅड. हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमापार पाठवण्यासाठी वापरले जात होते.
कोटली – एलओसीपासून १५ किमी दूर स्थित लष्कराचे हे शिवीर. या ठिकाणी ५० हून अधिक दहशतवाद्यांची क्षमता होती.