महावितरणच्या वेंगुर्ले कार्यालयातील दोन अभियंता निलंबित..

0
29

आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामात कसूर केल्याचा ठपका

सिंधुदुर्ग:-आपत्कालीन परिस्थिती असताना आणि मुख्यालय सोडू नये असे आदेश असताना कार्यालयात गैरहजर राहून कामात कसूर केला म्हणून महावितरण कंपनीचे उपविभाग वेंगुर्ले येथील उपकार्यकारी अभियंता अंकुश विजयराव कौरवार आणि शहर सहाय्यक अभियंता सचिन सखाराम उकंडे या दोन अधिकाऱ्यांना महावितरणचे सिंधुदुर्ग मंडळ अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी अरविंद वनमोरे यांनी निलंबित केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० मे पासून पाऊस वादळी वाऱ्या सह दाखल होईल. त्यामुळे या काळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क राहून मुख्यालय न सोडण्याचे आदेश जिल्हास्तरावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कडून देण्यात आले होते. मात्र वेंगुर्ले तालुक्यात वीज वितरण चा सावळा गोंधळ होताच नागरिकांनी वेंगुर्ले कार्यालयात धडक दिली असता हे दोन्ही अधिकारी कार्यरत नव्हते. याबाबत संताप व्यक्त करत नागरिकांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार त्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कामात अनियमीतता आणि दिलेल्या आदेशाचे पालन केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.