आजोबा ११ वेळा आमदार,भाऊही आमदार तरीही….डाॅ.अनिकेतनं केलं कोर्ट मॅरेज!

0
13742

सोलापूर,दि.११ः जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातवाने कोर्ट मॅरेज करून समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे.त्याच्या कार्याचा सर्वत्र कौतुक केला जात आहे.करोडोंची उधळण करून लग्न करणारे आणि हुंडाबळी साठी दबाव करणारे धनदांडग्यांच्या मुलामुलींना मात्र या लग्नसोहळ्याने चांगलीच चपराक दिली आहे.डाॅ.अनिकेत देशमुख यांचे आजोबा कै.गणपतराव देशमुख हे ११ वेळा आमदार राहिले.तर भाऊ सध्या आमदार असतानाही डॉ. अनिकेत देशमुखनं कोर्ट मॅरेज केलं!
एकाच मतदारसंघातून ११ वेळा आमदार राहिलेल्या कै. गणपतराव देशमुख यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा साधेपणाचा वारसा जोपासला आहे. त्यांचा एक नातू विद्यमान आमदार आहे तर दुसरा नातू डॉ. अनिकेत देशमुख हा देखील वैद्यकीय सेवा देत राजकारणात सक्रिय आहे. डॉ. अनिकेत यांनी नुकतीच लगीन गाठ बांधली, मात्र लग्नात त्यांनी कुठलाही बडेजावपणा केला नाही की कसला दिखाऊपणा केला नाही. प्रमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने कोर्ट मॅरेज केले.एवढा मोठा राजकीय वारसा असणारी कुटुंब एवढ्या साधेपणात लग्न करू शकतात तर आपण का करू शकत नाही ?