34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ टिप्पर दिंडीत घुसता घुसता वाचवला; वारकरी थोडक्यात बचावले

टिप्पर दिंडीत घुसता घुसता वाचवला; वारकरी थोडक्यात बचावले

0
47

blank

बुलढाणा- पंढरीच्या विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वाकी रायपूर येथील दिंडीमध्ये भरधाव टिप्पर शिरता शिरता चालकाने वाचवत रस्त्याखाली झाडावर धडकवला. यामुळे वारकरी थोडक्यात बचावले. चिखली ते इसरुळ मार्गावरील देऊळगाव घुबे गावाजवळ मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.
अमरावती जिल्ह्यातील वाकी रायपूर येथून १४ जून १९९२ पासून दिंडी सोहळा पंढरपूरसाठी निघतो. यावर्षी २८ मेपासून वाकी रायपूर येथून पायदळ वारीला सुरुवात झाली. चिखली तालुक्यातून महामार्गानंतर आडमार्गाने मलगी, देऊळगाव घुबे ते इसरुळकडून ही दिंडी निघाली होती. देऊळगावजवळ आज संध्याकाळी जात असताना टिप्पर रेती भरण्यासाठी गेले. एक विनानंबर टिप्परदेखील भरधाव जात होता. पुढे वारकरी चालकाला दिसले नाही. जवळ गेल्यानंतर दिंडी चालल्याचे दिसताच चालकाने प्रसंगावधान राखून टिप्पर रस्त्याखाली घातला. अनियंत्रित झालेले वाहन खड्ड्यात जाऊन पुढे झाडाला धडकले. यामुळे वारकऱ्यांचा जीव वाचला.
या घटनेनंतर घटनास्थळावर एकच गर्दी जमली. दरम्यान, सुखरूप वाचल्याची भगवंत कृपा झाल्याचा भाव मनी बाळगून दिंडी मार्गस्थ झाली आणि देऊळगाव घुबे येथे दरवर्षी प्रमाणे मुक्कामाला वारकरी थांबले.

blank