
हिरडामालीजवळील भीषण अपघात…
कुटुबिंयाचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु
गोंदिया,दि.१९:राज्याचे माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने (MH 35,AR-2159)विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.ही दुर्घटना गोंदिया–गोरगाव मार्गावरील हिरडामाली परिसरात घडली.अपघातानंतर आमदार फुके हे घटनास्थळी न थांबल्याने कुटुंबियामध्ये त्यांच्याबद्दल रोष उफाळून आल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे ज्या पोलीस वाहनाने अपघात झालेला आहे,त्या वाहनाचा विमा हा आॅनलाईन तपासल्यावर विमा अपडेट नसल्याचे दिसून आले.तर पोलीस विभागातील कांहीनुसार गृपविमा आहे.परंतु उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांशी सपंर्क केल्यावर गृप असो की व्यक्तीगत विमा असल्यास आॅनलाईनला दिसायलाच हवे असे त्यांचे म्हणने आहे.
मृतकाचे नाव अरविंद पन्नालाल चव्हाण (वय 3०, रा. महाजनटोली गोरेगाव) असे असून, तो गोंदियाकडून गोरगावच्या दिशेने दुचाकीने जात होता. याच दरम्यान गोंदियाच्या दिशेने जात असलेल्या परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने (MH 35,AR-2159)समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेनंतर अरविंद चव्हाण गंभीर जखमी झाल्याने जखमीला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस स्टेशन करत असून, अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आ.फुके जोपर्यंत येत नाही,तोपर्यंत उत्तरीय तपासणी नाही-कुटुबिंयाची भूमिका
हिरडामाली पेट्रोलपंपासमोर आज घडलेल्या पोलीस वाहनातील अपघातात आपला मुलगा गमावलेल्या आई देवागंण चव्हाण व मृतकाची पत्नी भाग्यश्री अरविंद चव्हाण यांनी ज्या आमदारांच्या ताफ्यातील वाहनाने आमचा आसरा हिरावून घेतला.त्या ताफ्यातील आमदार परिणय फुके यांना आमच्या दुःखाचे काहीच कसे कळत नाही.ते जोपर्यंत जिल्हा रुग्णालयात येत नाही,तोपर्यंत उत्तरीय तपासणी करु देणार नाही.आम्हाला त्यांच्याकडून काही आर्थिक मदत नको,परंतु संवेदना तरी येऊन व्यक्त करायला काय जाते असे म्हणाल्या.

दरम्यान गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल,गोंदिया पंचायत समितीचे व बाजार समितीचे सभापती मुनेश रहागंडाले,गोंदिया बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पटले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतकांच्या कुटुबियांनी सुरु केलेल्या आंदोलनास्थळी जात भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या.माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, माजी सभापती मनोज बोपचे,विश्वजित डोंगरे,गुड्डू कटरे ,केलराम बघेले आदी उपस्थित होते.दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अशोक गुप्ता,गंंगाधर परशुरामकर,दुबे आदींनी रुग्णालयात भेट देत नातेवाईंकाशी संवाद साधला.






