
9 तरुणी आणि 4 तरूणांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं
वाराणसी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संसदीय क्षेत्र वाराणसीमध्ये पोलिसांनी एका हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. ज्या अपार्टमेंटमध्ये हे सेक्स रॅकेट चालू होते ते अरुण यादव यांचे अपार्टमेंट आहे, अरुण यादव हे भाजप नेत्या शालिनी यादव यांचे पती आहेत. पोलिसांनी अपार्टमेंटवर छापा टाकून 9 तरुणींना आणि चार तरूणांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाराणसी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये बऱ्याच काळापासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा सुरू आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यासोबतच शहरातील इतर अनेक ठिकाणांची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सिग्रा पोलिस स्टेशन परिसरातील कन्हैया लाल सराफ इमारतीतील फ्लॅट क्रमांक 112 वर पोलिसांनी छापा टाकला.
वाराणसीमध्ये स्पा सेंटर आणि होमस्टेच्या नावाखाली वेश्याव्यवसाय वेगाने पसरला आहे. त्यामुळे आयुक्तालय पोलिसांनी एसओजी-2 ची स्थापना केली आणि हे रोखण्यासाठी वारंवार छापे टाकण्यास सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांना वाराणसी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये बऱ्याच काळापासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी पोलिसांना 9 तरुणी आणि 4 तरुण आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. पोलिस पथकाला फ्लॅटमधून आक्षेपार्ह वस्तू, रजिस्टर, मोबाईल नंबर आढळले. फ्लॅटच्या बाहेर स्पा सेंटरचा फलक दिसत होता, परंतु आत जे आढळले ते पाहून पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आणि फ्लॅट सील केला.
छापादरम्यान, पोलिसांना आढळले की हा फ्लॅट स्थानिक भाजप नेत्या शालिनी यादव यांच्या पतीच्या नावावर आहे, ज्याने तो भाड्याने दिला होता. भाजप नेत्या शालिनी यादव यांनी यापूर्वी वाराणसीतून महापौरपद आणि खासदारकीची निवडणूक लढवली होती.
यानंतर त्यांनी 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. शालिनी सध्या भाजपमध्ये कोणत्याही पदावर नाहीत. व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या शालिनी यादव यांना त्यांचे सासरे काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्यामलाल यादव यांनी राजकारणात आणले. गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या शालिनी यादव यांचे लग्न श्यामलाल यादव यांच्या धाकट्या मुलाशी अरुणशी झाले आहे.





