मार्कापुरम-आंध्रप्रदेशमध्ये ट्रॅव्हल्सचा डंपरशी धडक होऊन अपघात घडला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक बसल्यामूळे मोठा अपघात झाला आहे. आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात पहाटेच्या वेळी एक मोठी अपघाताची घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी ट्रॅव्हल्सची डंपरशी भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मृतांचा आकडा 13 असल्याची माहिती मिळाली आहे.माहितीनुसार हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची ही बस तेलंगणातील निर्मल येथून आंध्र प्रदेशातील नेल्लोरकडे जात होती. 26 मार्च पहाटे सहाच्या वेळी मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरमजवळ बस आणि एका डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे.
धडक इतकी भीषण होती की, क्षणार्धात बसने पेट घेतला आहे. बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. 3 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पोलिसांनी सुरुवातीला मृतांची संख्या 13 सांगितली होती, मात्र नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने 13 जणांच्या मृत्यू झाला आहे, असे म्हटले आहे.
बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते, त्यापैकी 22 जण जखमी झाले आहेत. मार्कापुरमचे पोलीस अधीक्षक व्ही. हर्षवर्धन राजू यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 22 जणांना, ज्यात डंपर चालकाचाही समावेश आहे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते.
घटनेचा पंचनामा सुरू आहे, तर या अपघाताच्या घटनेत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आंध्रप्रदेशातील या भीषण अपघातावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी दुःख व्यक्त केले आहे. या अपघातामधील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.





