Home Top News पुणे – बस अपघातात दोघांचा मृत्यू, 36 जखमी

पुणे – बस अपघातात दोघांचा मृत्यू, 36 जखमी

0

पुणे, दि. 12 – भीमाशंकर येथे भक्तांच्या खासगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून 36 प्रवासी जखमी झाले आहेत. पोखरी घाटात रस्त्यावर बस पलटी होऊन हा अपघात झाला. बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना घोडेगाव, मंचर आणि पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. अपघातातील सर्व भाविक ओडिशाचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version