29.6 C
Gondiā
Wednesday, July 8, 2026
Home Top News पुण्यात वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत पावसाने कोलमडल, 14 कर्मचारी ढिगार्याखाली अडकल्याची भीती

पुण्यात वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत पावसाने कोलमडल, 14 कर्मचारी ढिगार्याखाली अडकल्याची भीती

0
15
पुणे/ वृत्तसेवा- वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत पावसाने पडल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 कर्मचारी ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुणे जिल्ह्यात ही मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत पडल्यामुळेे मोशी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 14 कर्मचारी ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या 3 मजली प्रशासकीय इमारतीमागील कचऱ्याचा मोठा ढिगारा अचानक इमारतीवर पडला आहे. त्यामुळे इमारतीचा काही भाग जमीनदोस्त झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले आहे. त्यानंतर पुण्यातील पोलीस, अग्निशामक दल, महापालिका प्रशासन आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकालाही बोलावण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, पहिल्या मजल्यावर अद्याप 14 जण अडकल्याची भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. एका गंभीर जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने इमारतीवर कोसळलेला कचऱ्याचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके प्रयत्न करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, पाणी साचणे यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, या दुर्घटनेचा अधिक तपास पोलिस यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.